आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतवाणीतून कथा‎:सोनपेठला रविवारपासून‎ शिवमहापुराण कथा‎

सोनपेठ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनपेठ शहराचे ग्रामदैवत श्री‎ रामेश्वर मंदिर येथे श्री रामेश्वर‎ प्रासादिक मंडळ यांच्या वतीने‎ महाशिवरात्री निमित्त‎ शिवमहापुराण कथा व ज्ञान यज्ञ‎ ज्ञानेश्वरी पारायण, अखंड‎ हरिनाम सप्ताहाचे आयोजन‎ करण्यात आले आहे.‎ यानिमित्त सात दिवस नामवंत‎ कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे.‎ १२ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणाऱ्या‎ शिवमहापुराण कथा व अखंड‎ हरिनाम सप्ताहाची सांगता १९‎ फेब्रुवारी रोजी होणार आहे.‎

यानिमित्त शिवमहापुराण कथाकार‎ रुक्मिणी ताई हावरे रोहनवाडी‎ यांच्या वाणीतून कथा श्रवण करता‎ येणार असून कथेची वेळ दुपारी १‎ ते ५ राहणार आहे.‎ कथेचे यजमान सुलोचना संभाराव‎ रत्नपारखे, जयश्री नरहरी‎ कुसुमकर, गंगाबाई सुधाकर पतंगे‎ हे दाम्पत्य असून सात दिवस‎ चालणाऱ्या या सप्ताहात‎ भागवताचार्य माधव महाराज कुरे‎ सोनपेठकर, भागवत महाराज‎ नखाते, विनोदाचार्य भारत‎ महाराज जोगी, दीपाली खिळे,‎ माऊली महाराज काकडे,‎ विजयानंद महाराज सुपेकर,‎ त्रिंबक महाराज दस्तापूरकर यांचे‎ हरि कीर्तन होणार असून डॉ. शरद‎ महाराज आंबेकर यांच्या काल्याचे‎ कीर्तन होऊन महाप्रसाद होईल.‎

शिवरात्री दिवशी सायंकाळी ६‎ वाजता शहरातील प्रमुख‎ मार्गावरून रामेश्वर भगवंताची‎ पालखी मिरवणूक काढण्यात‎ येणार आहे.‎ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या‎ जयंतीनिमित्त बबन महाराज घुगे‎ यांचा भारुड गवळणीचा कार्यक्रम‎ रात्री आठ वाजता होणार आहे.‎ या सर्व धार्मिक कार्यक्रमास‎ भाविक-भक्तांनी उपस्थित राहावे,‎ असे आवाहन श्री रामेश्वर‎ प्रासादिक भक्त मंडळ व सर्व‎ ग्रामस्थ सोनपेठकर यांच्या वतीने‎ तालुक्यातील भाविकांना करण्यात‎ आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...