आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी:गुणवत्तेची परंपरा अखंड ठेवण्याचे शिवाजी विद्यालयाचे काम प्रेरणादायी

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करणे व ती अखंड ५५ वर्ष कायम टिकवणे हे एका शैक्षणिक संस्थेसाठी व शाळेसाठी अवघड काम असते. ते अवघड काम शिवाजी विद्यालयाने केले आहे. हे खरोखरच शाळेसाठी कौतुकास्पद यश आहे असे गौरवोद्गार शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी काढले.

पूर्व प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या निमित्ताने बीड येथे आले असता उपसंचालक साबळे यांनी श्री शिवाजी विद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीकांत कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम पवार, साधनव्यक्ती नारायण नागरे, आयटीआयचे प्रा. कांबळे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे, उपमुख्याध्यापक राजकुमार कदम, संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब जगदाळे, पर्यवेक्षक बी.डी.मातकर,पर्यवेक्षक गिरीष चाळक यांनी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांचे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ आणि समाजसुधारक बलभीमराव कदम हे पुस्तक भेट देऊन यथोचित सत्कार केला.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे यांनी श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दिनकरराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाचा थोडक्यात आढावा मांडला.यावेळी साबळे शाळेच्या कामगिरीची माहिती घेत शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यासह मार्गदर्शनही केले.

बातम्या आणखी आहेत...