आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३० हजारांची लाच मागून स्विकारणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह अंमलदाराला सोमवारी एसीबीने गजाआड केले होते. दरम्यान, मंगळवारी एसपी नंदकुमार ठाकूर यांनी दोघांनाही तडकाफडकी निलंबित केले. तर, ठाणे प्रमुखांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करुन हा गुन्हा बी फायनल करण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राजू गायकवाडसह पोलिस अंमलदार विकास यमगर या दोघांना औरंगाबादच्या लाचलुचत प्रतिबंधक पथकाने सोमवारी सायंकाळी गजाआड केले होते. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा अहवाल पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना पाठवला गेला होता. मंगळवारी ठाकूर यांनी दोघांनाही सेवेतून निलंबीत केले. तर, या प्रकरणात पीआय केतन राठोड यांची चौकशी करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.