आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागृती:शिवारात स्वच्छता मोहिम; मिल्लिया महाविद्यालयातर्फे पर्यावरण व स्वच्छता जागृती

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या विद्यमाने पर्यावरण व स्वच्छता जनजागृती सप्ताहानिमित्त महाविद्यालय व फुलसांगवी गाव शिवारात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व फुलसांगवी येथील ग्रामस्थ यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवली. फुलसांगवी येथील तलाव व मंदिर परिसरात ही स्वच्छता केली. यावेळी डॉ. विष्णू सोनवणे, प्रा.डॉ. संध्या बिडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. विष्णू सोनवणे यांनी केले तर आभार डॉ. संध्या बीडकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस.एस. यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...