आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:‘शिवरायांच्या स्वराज्याचा पाया वनसृष्टीवरच अवलंबून होता’

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज हे पर्यावरण अभ्यासक होते. शिवरायांच्या स्वराज्याचा पाया वनसृष्टीवर अवलंबून होता, असे प्रतिपादन प्रा. डॉ. राजीव काळे यांनी केले.

श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबीर श्रीक्षेत्र कपिलधार येथे सुरू आहे. मंगळवारी सायंकाळच्या बौद्धिक सत्रामध्ये डॉ. राजीव काळे हे प्रमुख वक्ते होते. त्यांनी छत्रपतींच्या पर्यावरण विषयक धोरणावर मार्गदर्शन केले. डॉ. काळे म्हणाले, गवताची काडी गहाण न ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे वृक्षांवर जीवापाड प्रेम करत होते. वृक्षांची कत्तल हे मनुष्यवधाचा गुन्हा मानत होते. गड-किल्ले यांना वनराईने सजवले होते. त्यातून गनिमीकावा जन्माला आला. गनिमी काव्यामुळे शिवरायांच्या स्वराज्याला धक्का लागू दिला नाही. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाची काळजी घेणारा जगातील एकमेव राजा शिवाजी महाराज होते. झाडे म्हणजे रयत होय. त्यांना पिडा देऊ नका‌. रयतेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश शिवरायांनी दिला आहे.

आजच्या युवकांनी पर्यावरण विषयक छत्रपती शिवरायांचे अनुकरण केले तर परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही आणि आजच्या तरुणांनी छत्रपतींच्या विचारांची प्रेरणा घेऊन कार्य केले तर कोणत्याही समस्येला तोंड देण्याची शक्ती,ऊर्जा निर्माण होते. असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. मनोजकुमार नवसे तर आभार रासेयो स्वयंसेवक रवी राठोड यांनी केले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. अरुण दैतकार, डॉ. प्रकाश कोंका, प्रा. आर. बी नागरगोजे, अर्जुन निंबाळकर यांच्यासह ग्रामस्थ स्वयंसेवक याप्रसंगी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...