आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते अन् रुग्णालयासाठी तरुण चढला टाॅवरवर:आष्टी तालुक्यातील तरुणाचे शोले स्‍टाईल आंदोलन

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात जाण्यासाठी रस्ते नाहीत, गावातील रुग्णालयात डाॅक्टर नसल्याने रुग्णांचे उपचाराअभावी हाल हाेत हाेते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊनही दखल घेतली गेली नाही. ३० जानेवारीला बीड जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले. यावरही काही हालचाल न झाल्याने अशोक शिवाजी माने (३४, रा. वाहिरा, ता. आष्टी) हे तिरंगा घेऊन थेट बीडमधील पाेलिस मुख्यालयासमाेरील टाॅवरवर चढले.

चार तासांच्या आंदाेलनानंतर जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. अमाेल गिते यांनी वाहिरात आष्टी उपकेंद्रातील पिंपळा येथील समुदाय आराेग्य अधिकारी साैरभ शिंदे यांची नियुक्ती केली. दाेन रस्त्यांसाठी निधी मागणी तर एक रस्ता पाणंद याेजनेतून करण्याचा प्रस्तावाचे लेखी पत्र मिळाले. वाहिरा ते झांजे वस्ती, तरटे वस्ती ते धानोरा या रस्त्यांचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मुख्यमंत्री कार्यालय व बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊनही प्रश्न न सुटल्याने साेमवारी सकाळी ११ वाजता अशाेक टाॅवरवर चढले. लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर अशाेक यांनी आंदाेलन थांबवले.

बातम्या आणखी आहेत...