आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक‎ पाणीपुरवठा बंद:चिंचगव्हाणमध्ये शोले‎ स्टाईल केले आंदोलन‎

माजलगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील सहा महिन्यापासून‎ चिंचगव्हाण येथील सार्वजनिक‎ पाणीपुरवठा बंद असल्याने‎ ग्रामस्थांना पाण्यासाठी संघर्ष करावा‎ लागत असताना ग्रामपंचायत लक्ष‎ द्यायला तयार नाही. त्यामुळे बहुजन‎ समाज पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष‎ अॅड. अमोल डोंगरे यांच्या‎ नेतृत्वाखाली मंगळवार ३ जानेवारी‎ रोजी ग्रामस्थांनी गावातील‎ पाण्याच्या टाकीवर चढत शोले‎ स्टाईल आंदोलन केले.

पंधरा‎ दिवसांत सुरळीत व स्वच्छ‎ पाणीपुरवठा सुरू करण्याचे‎ ग्रामसेवक डी.एस.चव्हाण यांनी‎ आश्वासन देताच ग्रामस्थांनी‎ आंदोलन मागे घेतले.‎ चिंचगव्हाण ग्रामपंचायत अंतर्गत‎ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतील‎ पाणी नमुने तपासणी करुन पिण्यास‎ योग्य पाणी उपलब्ध करुन द्यावे,‎ गावातील नाले सफाई करावी या‎ मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगळवारी‎ गावातील पाण्याच्या टाकीवर चढून‎ लोकशाही मार्गाने आंदोलन केले‎ दरम्यान चिंचगव्हाण येथील‎ जलजीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र‎ पाणीपुरवठा योजना मंजूर असून‎ योजनेला कार्यारंभ आदेश‎ मिळालेला नसुन आदेश‎ मिळाल्यानंतर तात्काळ सदर‎ कामास सुरुवात करण्यात येईल.‎ त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला‎ जाईल असे लेखी आश्वासन‎ ग्रामसेवकाने दिल्यांनतर सदरील‎ आंदोलन किरण डोंगरे, अतिष‎ जाधव, सत्यपाल डोंगरे, संजय‎ डोंगरे, सनी डोंगरे, सत्यपाल‎ खळगे, ग्यानबा मस्के, प्रेम साळवे‎ यांनी मागे घेतले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...