आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशात ओबीसींना आरक्षण द्यायचेच, असा आपला ठाम निर्धार होता. दिवसरात्र मेहनत घेऊन न्यायालयात बाजू मांडली. आरक्षण मिळवून देईपर्यंत आयोग, प्रशासन व स्वतः आपण स्वस्थ बसलो नाही. मनातून काही द्यायचे असेल तर त्या दिशेने प्रयत्न केल्यास निश्चित मार्ग निघतो. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसींना आरक्षण देण्यासाठी इच्छाशक्ती दाखवावी, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केले आहे.
तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगडावर ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवराजसिंह चौहान, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, पंकजा मुंडे मोठ्या नेत्या आहेत. त्यांना जपा, त्यांच्यामागे पाठबळ उभे करा. गोपीनाथ मुंडेंचा वारसा त्या निश्चितपणे पुढे चालवतील.
ऊसतोड कामगारांच्या प्रगतीचे स्वप्न : धनंजय मुंडे
लोकनेते गोपीनाथ मुंडे हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व होते. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी संघर्ष केला. सर्वसामान्य माणसाची प्रगती, कामगारांचे कल्याण हे स्वप्न उराशी बाळगूनच मी काम करतो आहे. ऊसतोड कामगार महामंडळाची अधिकृत स्थापनादेखील झाली असून आता कामगारांसाठी योजनांच्या माध्यमातून प्रगतीचे स्वप्न पूर्ण करेन, असा निर्धार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
03 एकरावर मंदिर 2003 मध्ये संकल्प २०१७ मध्ये उभारणीस झाला प्रारंभ ०५ वर्षांनी कळसपूजन ८० साधुगण उपस्थित
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.