आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्केट‎ बोर्डिंग:श्रद्धाला नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक‎

परळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्रद्धा‎ रवींद्र गायकवाड या‎ खेळाडूने अहमदाबाद येथे‎ संपन्न झालेल्या ३६ व्या‎ नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण‎ पदक पटकावले.‎ अहमदाबाद येथे‎ नुकत्याच संपन्न झालेल्या‎ ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत‎ परळीच्या श्रद्धाने "स्केट‎ बोर्डिंग" स्पर्धेत हे पदक‎ पटकावले असून तिची‎ "स्केट बोर्डिंग" या क्रीडा‎ प्रकारात फ्रांसमध्ये होणाऱ्या‎ ऑलम्पिकमध्ये भारतीय‎ संघात निवड झाली आहे.‎

श्रद्धाचे वडील रवींद्र‎ गायकवाड हे पुण्यामध्ये‎ एका खासगी कंपनीत‎ सुरक्षा रक्षक म्हणून काम‎ करतात. अतिशय बिकट‎ परिस्थिती मधून श्रद्धाने ही‎ कामगिरी पूर्ण केली. तिच्या‎ या यशाबद्दल अभिनंदन‎ करण्यात येत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...