आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री क्षेत्र महर्षी गौतमऋषी संस्थान पालवन येथे पंचदिनात्मक हरिहर महायज्ञ मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळा श्री क्षेत्र नारायण गडाचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या हस्ते आणि गौतमऋषी देवस्थानचे महंत श्रीरंग महाराज डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांच्या साक्षीने झाला.
श्री. क्षेत्र गौतमऋषी देवस्थान जिल्ह्यात भाविक भक्तांच्या श्रद्धेमुळे विख्यात झाले असून दर अमावस्येला भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते. या देवस्थानवर येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी रस्ता, नाल्या, लाईट, पाणी अशा मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. संक्रांति दरम्यान त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी अलोट गर्दी असते.
त्याच धर्तीवर बीड व पंचक्रोशीतल भाविकांची प्रदक्षिणेसाठी गर्दी होते. गेली अनेक वर्षांपासून प्रदक्षिणेची परंपरा भक्तांनी संवर्धित केली असून, या देवस्थानचा महिमा महाराष्ट्रभर पसरेल असा आशावाद व्यक्त करून या संस्थानच्या विकासासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी भाविक भक्तांना संबोधित करताना दिला.
महर्षी गौतम ऋषीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्राचीन तपोभूमीत संत महंत ऋषीमुनींच्या कृपा आशीर्वादाने भाविक भक्तांच्या विशेष परिश्रमातून श्री त्र्यंबकेश्वर महादेव व श्री रुक्मिणी पांडुरंगाचे भव्य नतून मंदिराचे व शिखराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या मंदिरामध्ये श्री त्र्यंबकेश्वर श्रीनंदी श्रीरुक्मिणी पांडुरंग श्रीकैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय व महंत श्री गुरु महादेव बाबा यांच्या नतुन मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण तथा पंचकुंडात्मक पंचदिनी हरीहर महायज्ञ अशा भव्य महासोहळ्याचे गेल्या चार दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.