आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघ विजयी‎:तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री संत‎ भगवानबाबा विद्यालयाचा संघ विजयी‎

गेवराई‎2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री संत‎ भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी‎ वसाहत, बागपिंपळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी‎ तालुकास्तरीय कबड्डी विजय संपादन केला असून हा‎ संघ २८ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरावर कबड्डी‎ स्पर्धेसाठी सहभागी होणार आहे.‎ जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने तालुका स्तरीय‎ विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या‎ स्पर्धेत तालुक्यातील शाळांनी मोठ्या प्रमाणात‎ सहभाग नोंदविला असून बुधवारी (ता.२३) मैदानी‎ खेळाचे आयोजन करण्यात आले होते.

या क्रीडा‎ स्पर्धेत श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय‎ जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या शाळेतील‎ विद्यार्थ्यांनीच्या कबड्डी संघाने सहभाग नोंदविला‎ होता. या कबड्डी संघामध्ये वंदना सुभाष माळी,‎ शितल संतोष सुळ, तनुजा गणेश देवकते, दिपाली‎ सुंदर वक्ते, रेखा विश्वनाथ माळी, शालू एकनाथ‎ माळी, अश्विनी हरीभाऊ देवकते, पल्लवी‎ भाऊसाहेब सुळ, कांबळे साईली आदी विद्यार्थ्यांनी‎ सहभाग घेतला.‎ या कबड्डी संघाने धोंडराई शाळेच्या संघाचा पराभव‎ करून हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. शेवटी‎ गढीच्या शाळेच्या संघाचा पराभव करून शेवटी हा‎ संघ जिल्हास्तरावर खेळण्यासाठी विजय झाला‎ असून २८ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत‎ सहभागी होणार आहे. विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव‎ गोपीनाथराव घुले, मुख्याध्यापक बापुराव घुले, सर्व‎ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन‎ शाळेच्या वतीने सत्कार करुन त्यांना पुढील‎ वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...