आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या बेजबाबदार आणि अक्षम्य विधानामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावनांना ठेच पोहोचत असल्यामुळे त्यांना राज्यपालपदावरून त्वरित दूर करण्यात यावे, त्यांचा राजीनामा घ्यावा यासह इतर मागण्यांसाठी बीड जिल्हा बंदला सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळाला तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमी, आंबेडकरप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. हे सत्र यावरच न थांबता प्रसाद लाड, त्रिवेदी, दानवे यांनी अाक्षेपार्ह वक्तव्ये करून माराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे शिवप्रेमी व आंबेडकरप्रेमींनी सोमवारी ( १२ डिसेंबर) बीड ज़िल्हा बंदची हाक दिली होती. त्यासाठी सर्व धर्मातील, जातीतील जनतेने, सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटनांनी पाठिंबा देऊन जिल्हाभरात बंद पाळला.
बीड शहरात सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मूकमोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात निषेध नोंदवणारे फलक हातात घेऊन पदाधिकारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने निवेदन दिल्यानंतर मूकमोर्चाचा राष्ट्रगीताने समारोप झाला.
या होत्या प्रमुख मागण्या
गेवराई शहरातील सर्वधर्मीय शिवप्रेमी बांधवांनी आज बंदमध्ये सहभाग घेतला होता. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, रावसाहेब दानवे, मंगलप्रभात लोढा, संतोष दानवे, प्रसाद लाड आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या पदावरून हाकलण्यात यावे आणि महाराष्ट्रात संभ्रमाचे आणि अशांततेचे वातावरण निर्माण केल्याबद्दल त्यांच्यावर भादंविअंतर्गत गुन्हे नोंदवावेत. महापुरुषांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्यांविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा कायदा करा.
गेवराई : विविध संघटना उतरल्या रस्त्यावर
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ते तहसील कार्यालय यादरम्यान अतिशय शिस्तबद्ध निषेध रॅली निघाली. रॅलीदरम्यान ठिकठिकाणाहून शिवधर्मीय बांधव अधिकाधिक संख्येने या रॅलीत सहभाग घेताना दिसून येत होते. विविध राजकीय, सामाजिक व मुस्लिम संघटना या रॅलीला प्रोत्साहन देत व सहकार्य करत या रॅलीत सहभागी होत गेल्या. दरम्यान, गेवराई पोलिसांनी रॅली व मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.
केज : शहर बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद
सतत बदनामीकारक वक्तव्य केले जात असल्याच्या निषेधार्थ सोमवारी पुकारण्यात आलेल्या केज शहर बंदला दुपारपर्यंत व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. महापुरुषांची बदनामी थांबवा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, केज विकास संघर्ष समिती, बहुजन वंचित आघाडी, छावा संघटना यांच्या वतीने सोमवारी केज शहर बंद पुकारण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.