आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईगलवूड इंग्लिश स्कूल माजलगाव येथे नुकतेच सुवर्ण महोत्सवी विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते़. यामध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी उच्च प्राथमिक स्तर यासाठी माजलगाव तालुक्यातून ग्रामीण व शहरी अशा एकूण ३५ शाळांनी सहभाग नोंदवला तर ९ वी ते १२ वी माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर यासाठी माजलगाव तालुक्यातून शहरी व ग्रामीण एकूण २५ शाळांनी सहभाग नोंदवला या दोन्ही गटांसाठी वेगवेगळ्या विषयांवर आधारित विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखवले होते. यामध्ये सिंदफणा पब्लिक स्कूलची सातवीतील विद्यार्थिनी यशश्री गायकवाड हिने प्राथमिक स्तर या गटातून वाहतूक व नवोपक्रम या विषयावर या विज्ञान प्रकल्पाला प्रथम पारितोषिक मिळाले.
या बद्दल तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे कुलकर्णी, विषय तज्ञ शिक्षक पोटभरे, आयोजक शाळेच्या अर्चना पवार, प्राचार्य आनंद यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. विज्ञान प्रकल्पाची निवड जिल्हास्तरीय होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनासाठी झालेली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, सचिव मंगल सोळंके, समन्वयक निला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम, विज्ञान विभाग प्रमुख राजेंद्र सवई, विज्ञान शिक्षक अनिल राठोड, वैजनाथ बडे, संध्या नोकवाल, यांनी यशश्री गायकवाड हीचे स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.