आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीपी:साबला येथे मुंदडांच्या हस्ते सिंगल फेज डीपीचे काम सुरू

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील साबला येथील कटारेवस्ती व नाईकनवरे वस्ती या दोन वस्तीवर आमदार नमिता मुंदडा यांच्या फंडातून सिंगल फेज डीपी मंजूर झाल्या आहेत. या डीपी उभारणीच्या कामाचे उद्घाटन युवानेते अक्षय मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. सिंगल फेज डीपी कार्यान्वित झाल्यानंतर विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे.

कार्यक्रमाला महादेव सूर्यवंशी, शरद इंगळे, सुरेश नांदे, सहायक अभियंता मुंडे, लाईनमन डिकले, वळसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अक्षय मुंदडा म्हणाले, माजी मंत्री स्व. विमलताई मुंदडा यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे केली होती. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात या गावातील प्रलंबित विकासात्मक मार्गी लावू अशी ग्वाही दिली. यावेळी साबला ते उमरी व साबला ते कोल्हेवाडी या रस्त्यांसह दत्त वस्ती व नाईकनवरे वस्ती रस्त्याच्या प्रश्न, बौध्द समाजासाठी स्मशानभूमी, नाईकनवरे यांच्या स्मशानभूमीचे काम मार्गी लावण्याच्या मागणीचे निवेदन गावकऱ्यांनी मुंदडा यांच्याकडे सादर केले. डीपीसाठी जागा देणारे शेतकरी गणेश दशरथ कटारे यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन व प्रस्ताविक नरहरी शहाजी काकडे यांनी केले. कार्यक्रमाला अरुण राऊत, भैरवनाथ चाळक, अशोक नाईकनवरे, रामराजे शिंदे, अशोक काकडे, पोपट काकडे, रंगनाथ काकडे, मधुकर नाईकनवरे, उध्दव नाईकनवरे, सोपान नईकनवरे, लखन राऊत, दशरथ कटारे, लखन कटारे, इंटर नाईकनवरे, गणेश सरवदे, श्रीमंत नाईकनवरे, अनिल भोसले, दिलीप नाईकनवरे, प्रकाश नाईकनवरे हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...