आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापासत्र:सिरसाळा पोलिसांचे अवैध धंद्यांविरोधात छापासत्र सुरू

सिरसाळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरसाळा पोलिसांनी मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांविरोधात विशेषत: अवैध दारू हातभट्टीविरोधात मोहीम उघडली असून रोज कारवाया करण्यात येत आहेत. यामुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर आणि विशेषत: दारू विक्री विरोधात कारवाया करण्याचे सत्र सिरसाळा पोलिसांनी सुरू केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी कारवाई करत आहेत. सिरसाळा गावासह परिसरातील पोहनेर, पिंपरी, रामनगर तांडा, आचार्य टाकळी, नागझरी तांडा, गोवर्धन या ठिकाणी पोलिस पथकाने छापा टाकून विनापरवाना बेकायदेशीररित्या रसायनमिश्रित गूळ मिश्रित,हातभट्टीची दारू विक्रीसाठी करत असताना सात जणांना पकडले व त्यांच्याकडून सुमारे ९५ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त केले.

यामध्ये बाळू रंगनाथ गायकवाड,अशोक गायकवाड (रा.पोहनेर), साहेबराव चव्हाण (रामनगर तांडा), गणेश शंकर किरवले (आचार्य टाकळी♦), गुलाब पवार (नागझरी तांडा), मुकेश जाधव (सिरसाळा), तुळशीराम गायकवाड (गोवर्धन) यांच्यावर कारवाई केली. दुसऱ्या एका घटनेत पौळ पिंपरी गावात जुगार खेळताना लक्ष्मण शिंदे, सूर्यकांत ताटे, दत्ता उजगरे, धम्मानंद उजगरे, राम शिंदे, मुनवर पठाण हे जुगार खेळताना आढळून आल्याने कारवाई करण्यात आली. २८५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस कर्मचारी रमेश नागरगोजे, संतोष नागरगोजे, अक्षय देशमुख यांनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...