आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरळी तालुक्यातील सिरसाळा येथे एमआयडीसी उभारण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यात येवुन महा विकास आघाडी सरकारच्या काळात एमआयडीसी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. आता मैत्री विधेयक मंजूर होताच ही एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू होणार असुन या एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योगांना चालना व रोजगारनिर्मिती बाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात बोलतांना सांगीतले. दरम्यान उद्योगमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सिरसाळा येथील ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तालुक्यातील सिरसाळा येथे एमआयडीसीची लवकर उभारणी व्हावी म्हणून आमदार धंनजय मुंडे यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्ष वेधले. तालुक्यात थर्मल पावर स्टेशन, रेल्वे, वाहतूक सुविधा, ज्योतिर्लिंग क्षेत्र असल्याने देशभरातून लोक परळीत येतात.
सिमेंट फॅक्टरी, वीट उद्योग अशा बऱ्याच पूरक गोष्टी उपलब्ध आहेत. शिवाय तालुक्यातील सिरसाळा येथे एमआयडीसीची जमीन अधिग्रहण करून त्या जमिनीस एमआयडीसी क्षेत्र म्हणून महा विकास आघाडी सरकारच्या काळात घोषित करण्यात आले असुन आता एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू करून विकसित करण्याची मागणी अर्थ संकल्पिय अधिवेशनात केली. उद्योगांना परवानगी मिळण्यात सुलभता आणण्यासाठी सादर करण्यात आलेल्या मैत्री विधेयकाच्या चर्चे दरम्यान आमदार धनंजय मुंडे यांनी तालुक्यातील सिरसाळा एमआयडीसी विकसित करण्याबाबत मागणी केली. तेंव्हा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घोषणा करत .मैत्री विधेयक मंजूर होताच, सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील परळीची एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू करून विकसित करण्यात येणार असल्याचे सांगीतले. परळी मतदारसंघ व जिल्ह्यातील या एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योगांना चालना व रोजगार निर्मितीबाबत लवकरच निर्णय होणार आहे.
एमआयडीसी सुरू झाल्यास बेरोजगारांना संधी
सिरसाळा-सोनपेठ मार्गावर प्रस्तावित एमआयडीसी होणार आहे. या ठिकाणी सध्या जमीन आरक्षीत करण्यात आली आहे. या ठिकाणी अजुन बोर्ड सुध्दा लागलेला नाही. एमआयडीसी सुरू झाल्यास सिरसाळा येथील बेरोजगारांना रोजगारची संधी मिळणार आहे.
उद्योगांनी गुंतवणूक केल्यास रोजगाराची संधी
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. मागासलेल्या भागाचा विकास करण्यासाठी विविध उद्योगांनी इथे गुंतवणूक केल्यास, मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्यामुळे सरकारने एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू करून विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. - धनंजय मुंडे आमदार, परळी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.