आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असुविधा:पाटोदा येथील राज महंमद चौकातील स्थिती, अस्ताव्यस्त वाहने लावल्याने रहदारीला अडथळा

पाटोदा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा शहरात प्रत्येक गुरुवारी आठवडी बाजार भरतो जातो. या दिवशी शहरात ग्रामीण भागातून वाहने प्रचंड संख्येने येतात. या वाहनांच्या पार्किंगची कसलीही सोय नसल्याने वाहनधारक अस्ताव्यस्त पध्दतीने रस्त्याच्या कडेलाच, वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने वाहने उभी करतात. त्यामुळे राज महंमद चौक याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मागील आठवड्यात रुग्णवाहिकेलाही याठिकाणी १५ ते २० मिनिटे वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ आली होती. किमान बाजाराच्या दिवशी तरी याठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस असणे गरजेचे आहे.

पाटोदा शहराची लोकसंख्या २० ते २२ हजाराच्या हजारच्या आसपास असून शहरात चार चाकी व दुचाकी वाहनांचीही प्रचंड संख्या झाली आहे. त्यातच पाटोदा शहरात वाहतुक नियमांचे कोणालाही सोयरेसुतकं नसल्याने अस्ताव्यस्त पध्दतीने वाहने उभी केलेली दिसतात. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावर दुभाजक असून देखील येथील वाहनधारक विरूध्द दिशेने अगदी विरूद्ध वाहने नेतात. एरवी या सर्वाकडे कोणाचेही फारसे लक्ष जात नाही. मात्र गुरुवारच्या दिवशी पाटोद्यात आठवडी बाजार भरतो. या दिवशी सकाळी बाजारात आपला माल घेऊन येण्यासाठी व्यापारी मोठी वाहने घेऊन थेट बाजारतळात येतात.

या ठिकाणी माल खाली केल्यानंतर ही वाहने थांबवण्यासाठी कोणतीही खास जागेची सोय नसल्यामुळे ही वाहने कुठेही रस्त्यावर उभी केली जातात तर दुपारच्या वेळी पुलाजवळ काही व्यापारीही आपली दुकाने थेट रस्त्यावर थाटतात. त्यामुळे भर उन्हाच्या वेळी या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. याचा त्रास महिला, विद्यार्थी व वृद्ध नागरिकांना सहन करावा लागतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन शहरात पाकीँगसाठी वेगळी जागा उपलब्ध करण्याची गरज निर्माण झाली.

मागच्या आठवड्यात रुग्णवाहिकेस अडथळा
गेल्या आठवड्यातच गुरुवारी बाजारच्या दिवशी पुलाजवळील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने चक्क रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकली होती. या ठिकाणी मोठमोठ्याने २० मिनिटे सायरन वाजवल्यानंतरही रुग्णवाहिका बाहेर निघणे मुश्किल झाले होते. त्यामुळे किमान गुरुवारच्या दिवशी तरी या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीसाची नियुक्ती गरजेची आहे.

बातम्या आणखी आहेत...