आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जन्मठेपेची शिक्षा:सहावर्षीय बालकाचा नरबळी देणाऱ्या सहा दोषींना जन्मठेप, पिंपळगाव (डोळा) येथील प्रकार, साडेतीन वर्षांत सुनावणी

कळंब6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृतात्म्याला तृप्त करण्यासाठी व घरात शांती लाभावी म्हणून भोंदूबाबाच्या सांगण्यावरून तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील एका ६ वर्षांच्या निरागस बालकाचा नरबळी देण्यात आला. याप्रकरणी उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याची न्यायालयात साडेतीन वर्षे सुनावणी चालली.

कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथे २६ जानेवारी २०१७ रोजी ही घटना घडली. गावात आई-वडिलांसोबत शेतात राहणाऱ्या ६ वर्षांच्या कृष्णा इंगोले या मुलाला डोक्यात लाकडी रुमण्याने जबर मारहाण करून खून केल्याचे समोर आले होते. आई सारिका यांच्या तक्रारीवरून २७ जानेवारी २०१७ रोजी कळंब पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी ४ ते १० फेब्रुवारी २०१७ दरम्यान भोंदूबाबा लखन चुडावकर, उत्तम इंगोले, ऊर्मिला इंगोले, सुवर्णा भाडके, द्रौपदाबाई ऊर्फ लक्ष्मी पौळ व साहेबराव प्रल्हाद इंगळे यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच १३ एप्रिल २०१७ रोजी द्रौपदीने नरबळी दिल्याचा जवाब दिला.

आराेपी व मुलाला एकत्र पाहिले हाेते : या खटल्यातील एका साक्षीदाराने आरोपी व मृताला यांना एकत्र पाहिले हाेते. त्यामुळे त्याची साक्ष या प्रकरणात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोपीच्या मोबाइलचे रेकॉर्डिंग व टॉवर लोकेशन, कराड येथील मूर्तिकार, समाधीचे बांधकाम घेणारा गुत्तेदार, आरोपी लखनचा मित्र यांचीही साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. कृष्णाच्या मृत्यूपूर्वी व मृत्यूनंतर घडलेल्या छोट्या छोट्या घटनांची साखळी हीच परिस्थितीजन्य पुरावा म्हणून मांडण्यात सरकारी पक्षाला यश आले.

बातम्या आणखी आहेत...