आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध स्पर्धा:अमृतमहोत्सवी स्पर्धेत न्यू इरा स्कूलला सहा पारितोषिके ; पंडित यांच्या हस्ते बक्षीस वितरण

गेवराई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंचायत समिती व तहसीलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांत इरा स्कूलने सर्वात जास्त पारितोषिक पटकावून प्रथम क्रमांक पटकावला. आमदार लक्ष्मण पवार व माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

व्यासपीठावर तहसीलदार सचिन खाडे, प्रभारी गटविकास अधिकारी सचिन सानप, प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंडित गोपालघरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोले, पोलीस निरीक्षक रविंद्र पेलगुरवार यांची उपस्थिती होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महसूल प्रशासन व पंचायत समितीच्या वतीने ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान चित्रकला, निबंध, वक्तृत्च, रॅली व नृत्य अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गेवराई शहरातील न्यू इरा स्कूलने विविध स्पर्धेमध्ये बक्षिसे मिळविले. यातील नृत्य स्पर्धेमध्ये मोठ्या गटात इरा स्कूलने प्रथम क्रमांक मिळवला, तसेच चित्रकला स्पर्धेत दिव्या भुतडा हिला तृतीय पारितोषक मिळाले. निबंध स्पर्धेत पृथ्वीराज लामकाने द्वितीय तर सानिया मणियारला तृतीय पारितोषिक मिळाले. वक्तृत्व स्पर्धेत सर्वेश सोनी द्वितीय तर रितेश मस्के यास तृतीय पारितोषक मिळाले. संस्थेचे अध्यक्ष गणेश क्षीरसागर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...