आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपयुक्त‎:आत्मनिर्भर भारतासाठी कौशल्य‎ अधारित अभ्यासक्रम उपयुक्त‎

पाटोदा‎2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्मनिर्भर होण्यासाठी कौशल्याधारित‎ अभ्यासक्रम उपयुक्त आहेत. त्यामुळे‎ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नियमित‎ अभ्यासक्रमाबरोबर कौशल्याधारित‎ अभ्यासक्रम पूर्ण करावेत, असे प्रतिपादन‎ उपप्राचार्य प्रा. डॉ. गणेश पाचकोरे यांनी‎ केले.‎ येथील नवगण शिक्षण संस्था संचालित‎ वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयात बुधवारी (ता.२३ नोव्हेंबर)‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा‎ विद्यापीठ मान्यताप्राप्त आजीवन शिक्षण व‎ विस्तार कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत‎ होते.

व्यासपीठावर पदव्युत्तर विभाग‎ संचालक डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ‎ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव‎ चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड,‎ आजीवन शिक्षण व विस्तार कक्षाचे‎ संचालक डॉ. पंडीत सिरसट, हिंदी‎ विभागप्रमुख डॉ. बळीराम राख, ग्रंथपाल‎ प्रा. जगन्नाथ पटाईत आदि उपस्थित होते.‎ प्राचार्य आबासाहेब हांगे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात‎ डॉ. गणेश पाचकोरे पुढे म्हणाले की,‎ पारंपरिक अभ्यासक्रम हे युवकांना नोकरी‎ अथवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध‎ करून देऊ शकतात परंतु आत्मनिर्भर‎ होण्यासाठी कौशल्ये विकसित करणे जास्त‎ आवश्यक आहे. याप्रसंगी डॉ. बळीराम‎ राख यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन‎ केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पंडीत‎ सिरसट यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.‎ जगन्नाथ पटाईत यांनी केले. आभारप्रदर्शन‎ प्रा. विठ्ठल शिंदे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...