आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांना गणित विषय फार अवघड वाटतो. मात्र अबॅकसमुळे विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती निश्चित दूर होईल. यामुळे उत्तम विद्यार्थी आणि पर्यायाने कुशल अधिकारी घडतील असे मत बीड येथील प्रसिध्द सीए तथा श्री क्षेत्र नारायणगडाचे विश्वस्त बी.बी.जाधव यांनी व्यक्त केले.
शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे गुरुवारी अबॅकसमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पत्रकार संतोष मानूरकर, सीए आदेश नहार, दिव्य मराठीचे ब्युरोचिफ दिनेश लिंबेकर, जिल्हा बालविकास अधिकारी रामेश्वर मुंडे, प्रगतीशील शेतकरी कल्याण कुलकर्णी आदी उपस्थित होते. बीड येथील अबॅकस ट्रेनिंग सेंटरचे अशोक घोडके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जाधव म्हणाले, अबॅकस ही गणितीय पध्दती असल्याने लहानपणापासूनच मुलांना अबॅकसचे ज्ञान द्यावे.
यामुळे मुलांच्या बुध्दिचा विकास होऊन अवघड वाटणारे गणित चुटकी सरशी सोडवणे सोपे जाईल. गणिताविषयी असलेला न्यूनगंड दूर होईल. अबॅकसमुळे हुशार विद्यार्थी निर्माण होऊन भविष्यात चांगले अधिकारी घडतील असे ते म्हणाले. प्रास्ताविकात अशोक घोडके यांनी अबॅकसच्या २२ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आणि ११ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये बीडच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन यश संपादन केल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.