आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कौशल्य शिक्षणातूनच मिळेल नोकरी ; प्राचार्य महेश देशमुख यांचे कार्यशाळेत प्रतिपादन

माजलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या स्पर्धेच्या युगात कौशल्याधिष्ठित शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे मत प्राचार्य डॉ. महेश देशमुख यांनी व्यक्त केले. श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव हिंदी विभाग आयोजित मीडिया लेखन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर डॉ. विनायक देशमुख, हिंदी विभागप्रमुख प्रा. युवराज मुळ्ये, डॉ. गंगाधर उषमवार उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. महेश देशमुख म्हणाले, सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना जर टिकायचे असेल तर पदवी शिक्षणाबरोबरच काहीतरी कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे लागेल तरच भविष्यामध्ये आपणास योग्य ती नोकरी उपलब्ध होईल आणि जर आपण काळा सोबत राहिलो नाहीत तर आपण मागे पडल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच विद्यार्थ्यांनी हिंदी विभागाकडून जो मीडिया लेखन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गंगाधर उषमवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सना अत्तार व क्रांती ढगे यांनी तर आभार मोईन खान यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापकांची मोठी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...