आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फराळ वाटप‎:वसंतदादा पाटील महाविद्यालयाकडून‎ पालावर फराळ वाटप‎

पाटोदा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नवगण शिक्षण संस्था संचालित‎ वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयातील समाजोन्नती कक्षाच्या वतीने पाटोदा‎ परिसरातील मसणजोगी बांधवांच्या वस्तीवर व‎ मजुरांच्या पालावर जाऊन फराळ वाटप करण्यात‎ आला. दिवाळीचे गोडधोड पदार्थ पालावर आयुष्य‎ काढणाऱ्या भटक्या गरीब बांधवांना मिळाले पाहीजे‎ यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.‎

उपक्रमामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर‎ कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. प्राचार्य आबासाहेब हांगे‎ यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ गणेश पाचकोरे,‎ समाजोन्नती कक्षाचे प्रमुख प्रोफेसर हमराज ऊईके,‎ सदस्य महेश देशमुख, विमल आलापुरे व डॉ सय्यद‎ शानूर यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...