आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकाचा मृत्यू:वडवणी येथे झोपेत दोन चिमुकल्यांना सर्पदंश; एका बालकाचा मृत्यू

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झोपेत असलेल्या दोन भावंडांना विषारी सापाने दंश केला. यात एका बालकाचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील वडवणी शहरात गुरुवारी पहाटे ही घटना घडली.

आदर्श ऊर्फ सागर बाळू गायकवाड (४) व आर्यन गायकवाड(६) हे दोन भाऊ आई-वडिलांसह वडवणी येथे राहतात. गुरुवारी पहाटे झोपेत असताना दोघा भावंडांना सापाने दंश केला. आई-वडिलांनी मुलांना खासगी रुग्णालयात नेले. यादरम्यान, आदर्शला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णालयात येण्यापूर्वीच बालकाचा मृत्यू झाल्याचे निदान केले.

बातम्या आणखी आहेत...