आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:...तर जे बदल राजकारणामध्ये घडले ते कदाचित घडले नसते ; धनंजय मुंडेंचे भावोद्गार

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकनेते गोपीनाथराव मुंडे आज हयात असते तर मागच्या ६ वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात जे बदल घडलेत, ते कदाचित घडले नसते, राजकारणातील सौहार्द कायम टिकून राहिले असते. मुंडे साहेबांसोबत सावलीसारखा राहिलो, त्यांच्या संघर्षाच्या काळातही क्षणोक्षणी सोबत होतो, अशा भावना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या. पांगरी येथील गोपीनाथ गडावर शुक्रवारी पालकमंत्री धनंजय मुंडे व माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी नतमस्तक होऊन गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केले. धनंजय मुंडे म्हणाले, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची उकल करून त्यांना न्याय देणारा मुंडे साहेबांचा आवाज होता, आम्हाला त्यांनी तिच शिकवण दिली व तिच शिकवण आम्ही अंगीकृत केली. आजही सर्वसामान्यांच्या न्यायासाठीचा त्यांचा तो आवाज माझ्या कानात घुमतोय, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, अजय मुंडे, अभय मुंडे, राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पौळ, मार्केट कमिटीचे संचालक सूर्यभान नाना मुंडे, बालाजी मुंडे, बाजीराव धर्माधिकारी, माणिक फड, चंद्रकांत कराड, अय्युब पठाण आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...