आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळा:तरुणाईचे समाजभान; खंडोबा यात्रा महोत्सवानंतर घनकचरा केला गोळा

सुनील मुंडे | गेवराई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई परिसरातील पालख्या डोंगरावरील खंडोबा यात्रा महोत्सवानंतर या परिसरातील घन कचरा गोळा करण्यासाठी रविवारी शेकडो तरुण, महिला, व विविध क्षेत्रातील मंडळी सहभागी होत स्वच्छता मोहीम राबवली. विशेष म्हणजे रुग्ण सेवा समिती गेवराई, चिंतेश्वर योग समिती व जिल्हा पर्यावरण मित्र यांच्या वतीने दोन दिवसापूर्वी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

शहरापासून चार कि.मी.अंतरावर गोविंद वाडी परिसरात प्राचीन खंडोबाचे मंदिर आहे. दरवर्षी येथे चंपा षष्ठीनिमित्त यात्रा भरते. जागृत देवस्थान असलेल्या खंडोबा यात्रेसाठी शहरासह गोविंदवाडी, वडगाव ढोक, मिरकाळा, गढी, रांजणी, खांडवी, तळेवाडी, खोपटी तांडा, मानमोडी, मन्यारवाडी, मोरे वस्ती, राज पिंप्री सह गेवराई तालुक्यातील हजारो भाविक मंदिरात दर्शन घेण्यासाठी दाखल होतात.

मागील आठवड्यात यात्रा महोत्सव संपला असून या परिसरात साचलेला घन कचरा गोळा करून परिसर स्वच्छतेसाठी रुग्ण सेवा समिती गेवराई, चिंतेश्वर योग समिती व बीड जिल्हा पर्यावरण मित्र यांच्या वतीने सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.

रविवारी सकाळी शहरासह तालुक्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी, तरुण, तरुणी,सह गणेश लिंबुरे, अभिषेक कचरे, प्रताप विठुरे, मस्के ओम, सुरेश टोनपे,राम महासाहेब,सीता महासाहेब, संकुनता लोखंडे ,सुरेखा दाभाडे, गीता पंडित, शिरीष भोसले,गोकुळ गोरे, डॉ. अनिल दाभाडे, राम महासाहेब, अॅड. केशव ठोसर, योग शिक्षक सतीश मेत्रे,अनंद जाधव, उज्वल पाटील,केशव पंडित,वचिष्ट उढाण, मच्छिंद्र गायकवाड,पृथ्वीराज भोसले, जयश्री साळुंके, मीनाक्षी शेटे, सुनील मुंडे, कुसुम मुंडे, श्रावणी मुंडे आदींसह मित्रमंडळी या उपक्रमात सहभागी झाले. घनकचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

सामाजिक संस्थांचा पुढाकार
यात्रे नंतर खंडोबा मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठी रुग्ण सेवा समिती गेवराई, चिंतेश्वर योग समिती व बीड जिल्हा पर्यावरण मित्र यांच्या वतीने सहभागी होण्याचे आवाहन केले असता रविवारी सकाळी विविध संघटनेचे पदाधिकारी, तरुण, तरुणी, मित्र मंडळांनी सामाजिक भान राखत उपक्रमात सहभाग नाेंदवला. यामुळे मंदिर परिसर चकाचक झाला.

बातम्या आणखी आहेत...