आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त जपले सामाजिक दायित्व; गेवराईमधील सामाजिक उपक्रमांचा महायज्ञ

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी आमदार अमरसिंह पंडित याच्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरामध्ये समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णाई येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर, अवयव दान संकल्प मोहीम, राष्ट्रवादी आपल्या दारी अभियान यासह वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले नेत्र तपासणी शिबिरासह अवयव दान संकल्प मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रवादी आपल्या दारी या अभियानाचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने कृष्णाई येथे अवयव दान संकल्प मोहीम राबविण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या प्रज्ञा खोसरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, महिला आघाडीच्या कमल निंबाळकर, संगीता तुपसागर, शाहीन पठाण, अवयव दान विभागाचे समुपदेशक अशोक मते, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मुक्ता आर्दड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अमरसिंह पंडित यांचा नेत्रदान संकल्प असलेला अर्ज अवयव दान विभागाचे समुपदेशक अशोक मते यांच्याकडे विजयसिंह पंडित यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यासह ई-श्रम कार्ड नोंदणीचा विजयसिंह पंडित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पनवेल येथील संजय घाडगे यांनी नेरे ता. पनवेल येथील स्नेहकुंज आधार येथे अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाला रायगड जि.प.सदस्य विलास फडके, पनवेल बाजार समितीचे संचालक संतोष पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दर्शन ठाकूर, कार्याध्यक्ष पिंगळे हजर होते.

गरजू महिलांना साड्या वाटप, तर सिरसदेवीत वृक्षारोपण
शिवशारदा मल्टिस्टेटच्या वतीने सिरसदेवी येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी अ‍ॅड. रावसाहेब रुचके, दत्तात्रय निकम, मनोहर गाडे, राजाभाऊ कदम, राजाभाऊ डोळस, सूर्यकांत भोगे, भरत कदम आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सलीम यांनी टाकरवण येथे गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सुनील तौर, संतोष खोमाड, महादेव कदम, आसाराम भुंबे, सतीश राठोड आदी उपस्थित होते. औषधनिर्माणशास्त्र संस्थेच्या वतीने गढी येथे वृक्षारोपण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...