आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळा, वडझरी (ता. पाटोदा, जि. बीड) या शाळेतील शिक्षकांनी नियमित वेतनासाठी गेल्या दोन वर्षांपासून समाज कल्याण कार्यालयासमोर वारंवार आंदोलन केले. या आंदोलनानंतर मागण्या मान्य करण्याचे आश्वासन तर मिळाले. मात्र, अद्यापपर्यंत ठोस कारवाई झालेली नसून या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांवर पुन्हा एकदा उपोषणाचा पर्याय अवलंबवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
याबाबत कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळा, वडझरी या शाळेतील कर्मचारी नियमित वेतनासाठी सातत्याने झगडत आहेत. संस्था चालकांकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक करण्यात येत आहे. यापूर्वीही प्रशासनास निवेदन देऊन न्याय मागण्या पूर्ण कराव्यात, अशी विनंती केली होती.परंतु प्रशासनाने नेहमीप्रमाणे दुर्लक्षित करून उपोषणातील मागण्यांसाठी चर्चा अथवा तडजोड केलेली नाही. अशा पध्दतीने उपोषणकर्ते यांना वेठीस धरून मानसिक छळ केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण न करता वेळ मारून नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. हे अत्यंत खेदजनक असून सदर कर्मचारी अत्यंत अस्वस्थ झाले आहेत. तरी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी राहुल थिटे, अशोक सानप, मच्छिंद्र आंधळे, प्रदीप नेवळे, कालिदास वनवे, दिपक बांगर, धनंजय सानप, संजय जायभाय आदींनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.