आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:डॉ.गवळे, प्रा.पाटील यांचे समाजकार्य कौतुकास्पद

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतिज्योती बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ७ वर्षांत १८ हजार बाधंवाना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे योगदान डॉ. राजकुमार गवळे व त्यांच्या पत्नी प्रा. अंजली पाटील यांनी दिले आहे, हे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यसनमुक्ती सेल जिल्हा अध्यक्ष डॉ.राजकुमार गवळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रा.अंजली पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी रक्तदान शिबिर, अन्नदान, पुस्तक वाटप, वृक्षारोपण आदी उपक्रम राबवण्यात आले. यावेळी विविध मान्यवर, आरोग्य कर्मचारी, जिल्हा व अंबाजोगाई उपजिल्हा रुग्णालय, कर्मचारी, पक्षाचे कार्यकर्ते, पंचक्रोशीतील मंडळी, कर्मचारी हजर होते. नागरिकांच्या सहकार्यातूनच सामाजिक कार्याला बळ मिळत असल्याचे याप्रसंगी डॉ.गवळे यांनी सांगितले. यापुढेही व्यसनमुक्तीचे कार्य असेच सुरु ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इतर मान्यवरांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...