आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:विश्वनगर, पोस्टमन कॉलनी भागातील‎ रस्ता व घंटागाडीच्या समस्या साेडवा‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विश्वनगर आणि पोस्टमन‎ कॉलनी भागातील रस्ता आणि घंटागाडीच्या‎ समस्या साेडवा, या मागणीचे निवेदन शिवसंग्राम‎ महिला आघाडीच्या वतीने बीड नगरपालिकेला‎ देण्यात आले. शहर उपाध्यक्ष संगीता ठोसर यांच्या‎ नेतृत्वात महिलांनी हे निवेदन दिले. बीड नगर‎ परिषदेने शहरातील ओला कचरा व सुका कचरा‎ गोळा करून बाहेर नष्ट करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट‎ दिलेले आहे.

मात्र, गुत्तेदारावर कुणाचाही अंकुश‎ राहिला नाही. अनेक गल्ल्यांमध्ये घंटागाडी घेऊन‎ जात नाहीत किंवा अवेळी जाते असे महिलांनी‎ सांगितले. याप्रसंगी संगीता ठोसर यांच्यासह वैशाली‎ सावरे, विमल सूर्यवंशी, विद्या जाधव, वर्षा‎ वाघमारे, दीपा वडगावकर, स्नेहलता कागदे, रेखा‎ खोपडे, सविता जवरे, सविता कोकाटे, रुक्मिणी‎ कुडके, सुशीला मोटे, गिरिजा विद्याधर, सत्यभामा‎ तारडे, मीना गलधर, प्रमिला वाळुंजकर आदी‎ महिलांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...