आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुली:सोनपेठला राष्ट्रीय लोकअदालतीत 1 हजार 211 प्रकरणे निकाली; 78 लाख 86 हजारांची वसुली

सोनपेठ6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

सोनपेठ येथील दिवाणी न्यायालयात १२ मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २४६ प्रलंबित आणि १ हजार ८७५ वादपूर्व अशी एकूण २१२१ प्रकरणे तडजोडी कामी ठेवली होती. यापैकी ३७ प्रलंबित असलेली व १ हजार १७४ वादपूर्व अशी एकूण १ हजार २११ प्रकरणे तडजोड होऊन निकाली निघाली. प्रलंबित प्रकरणात १८ लाख ७२ हजार ६९२ रुपये आणि वादपूर्व प्रकरणात ६० लाख १४ हजार ५३ रुपये अशी एकूण ७८ लाख ८६ हजार ७४५ रुपयांचा समावेश असलेली प्रकरणे तडजोडीव्दारे निकाली काढली. तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस. एस. खिरापते यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते.

या लोकअदालतीत धनादेश अनादरविषयी, कौटुंबिक हिंसाचार, तडजोडयुक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवली होती. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांची थकीत कर्ज वसुली तसेच पंचायत समिती, सोनपेठ अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींची घरपट्टी व नळपट्टीची वसुली तसेच नगर परिषद, सोनपेठ येथील नळपट्टीसंदर्भात वादपूर्व प्रकरण लोकअदालतीत ठेवलेली होती. लोकअदालतीच्या यशस्वीतेकरिता न्यायाधीश, पॅनल वरील विधिज्ञांनी काम पाहिले. या लोकअदालती तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर. एस. दिवाण, वकील संघातील सदस्य, बँकेचे अधिकारी, ग्राम पंचायतमधील अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...