आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सिरसाळा येथे जलयोजनेचे लवकरच भूमिपूजन; पालकमंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही

सिरसाळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरसाळा हे मोठे गाव विस्तारित होत असून येथे बाजारपेठ, एमआयडीसी यासोबतच विविध विकासकामे देखील पूर्ण करण्यात येत आहेत. सिरसाळा गावच्या पाणी पुरवठा योजनेचे काम देखील हाती घेण्यात येत असून, या कामाचे येत्या काही दिवसातच भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सिरसाळा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एम.टी.देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, मार्केट कमिटीचे सभापती अॅड. गोविंदराव फड, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे, उपसभापती जानिमिया कुरेशी, जि. प. सदस्य प्रा. मधुकर आघाव, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, बाजार समितीचे संचालक माऊली गडदे, डॉ. संतोष मुंडे, पं. स. सदस्य माऊली मुंडे, नंदागौळचे सरपंच सुंदर गीते, ज्येष्ठ नेते माधवराव नायबळ, वसंतराव राठोड, सिरसाळ्याचे सरपंच राम किरवले, चंद्रकांत कराड, रुस्तुम सलगर, इम्रान पठाण, देवराव काळे, संतोष पांडे, वैजनाथ देशमुख, सुरेश कराड, रवी बडे, भागवत कदम, कैलास जाधव, व्यंकट कराड, श्रीहरी कांदे, नदीम शेख, मोहम्मद इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती. सिरसाळा व परिसराने माझ्यावर अतोनात स्नेह व्यक्त केला आहे. या भागातील सर्वांगीण विकासाची व आर्थिक उन्नतीची जबाबदारी आपली असल्याचे सांगतच धनंजय मुंडे यांनी गावातील विविध विकास कामे मार्गी लावण्याची ग्वाही मुंडे यांनी दिली. यावेळी ग्रामस्थ हजर होते.

वांगी येथील संत नारायण बाबा संस्थानास ‘ब’ दर्जा देणार
वांगी येथील येथील संत नारायण बाबा संस्थानास क दर्जा प्राप्त असून ब दर्जा देण्याबाबत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीबाबत सकारात्मक विचार करून या संस्थानास ब दर्जा मिळवून देण्यासाठी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विनंती करून पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. संत नारायण बाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथीनिमित्त वांगी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याच्या समाप्तीस मुंडे यांनी भेट दिली. यावेळी श्री मुंडे यांनी संत नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शनही घेतले.

बातम्या आणखी आहेत...