आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार सोहळा:सोपान हाळमकर यांना स्व. चंद्रकला लाड स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

परळी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा साहित्य परिषद परळी शाखेच्या वतीने या वर्षापासून स्व. चंद्रकला लाड स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येत असून यंदा सोपान हाळमकर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.

वैद्यनाथ औद्योगिक वसाहत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मधू जामकर यांचा अभीष्टचिंतन सोहळाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शांतीलाल लाहोटी परिवाराच्या वतीने स्व.रंगलालजी लाहोटी व स्व.रुक्मिणीदेवी लाहोटी यांच्या स्मरणार्थ ग्रामीण वाचनालयास कृषीविषयक ग्रंथसंपदेचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसाप परळी शाखेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी तर व्यासपीठावर आबासाहेब वाघमारे, विकास डुबे, अरुणा दिवेगावकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत मुंडे यांनी, प्रास्ताविक प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड यांनी केले.

सन्मानपत्राचे वाचन दिवाकर जोशी, प्रा.संजय आघाव यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. अरुण पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड, कार्याध्यक्ष अनंत मुंडे, उपाध्यक्ष अरुण पवार, कोषाध्यक्ष प्रा.संजय अघाव, बंडू अघाव यांच्यासह सहसचिव सुनीता कोमावार, उपाध्यक्ष चेतना गौरशेटे, प्रसिद्धिप्रमुख बालाजी कांबळे, प्रा. अर्चना चव्हाण, सिद्धेश्वर इंगोले, केशव कुकडे, विजया दहिवाळ, प्रा.सुलभा वाघमारे, प्रा.डॉ.राजाभाऊ धायगुडे, भवानराव देशमुख, महेश होनमाने, दिवाकर जोशी, लक्ष्मण लाड, गणपत गणगोपलवाड, प्रा. डॉ. रा. ज. चाटे, प्रा. डॉ. बापू घोलप यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...