आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड:शिवसंग्रामच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. ज्योती मेटे यांच्याकडे; पक्षाला वाढवण्याचा विश्वास

बीड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्याकडे देण्यात आली. पुण्यातील डॉ. नितू मांडके सभागृहात प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. तीत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी डॉ. मेटे यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड केली.

भाजपने राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषद सदस्यपदी डॉ. मेटे यांची शिफारस करावी, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान द्यावे,असे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. शिवसंग्राम संघटनेची इमारत बेवारस सोडणार नाही. शिवसंग्राम टिकवणार - वाढवणार यात तिळमात्र शंका नाही, असे डॉ. मेटे म्हणाल्या.

आरक्षण, स्मारकासाठी लढणारच

डॉ. मेटे म्हणाल्या की, आता आसवांना बांध घालून पुढे जायचे आहे. मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक यासाठी लढणारच आहे.

बातम्या आणखी आहेत...