आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधारूर मध्ये दोन मंडळांमध्ये पेरणी; तर दोन मंडळांत पावसाची प्रतीक्षा कायमतालुक्यातील तेलगाव व मोहखेड या दोन महसूल मंडळांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे मागील आठ दिवसांपासून पेरणीची लगबग सुरू आहे, तर दोन मंडळांमध्ये पाऊस न झाल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पुरेसा पाऊस न झाल्याने शिवारात अद्याप ढेकळे कायम असून पावसाची हजेरी होताच या ठिकाणी पेरणीला सुरुवात होईल. मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास पिकास चांगला उतारा येतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव असल्यामुळे शेतकरी मृगात पेरणी करण्याच्या तयारीत होते. तसा अंदाजही वर्तवण्यात येत होता
यासाठी शेतकऱ्यांनी खते, बी-बियाणे मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवली आहेत. परंतु, तालुक्यामध्ये केवळ तेलगाव आणि मोहखेड या मंडळातच पेरणीयोग्य पाऊस झाला, तर धारूर आणि अंजनडोह येथील शेतकरी मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मोहखेड मंडळातील फकीर जवळा, देवदहिफळ, संगम, आमला- लिमला, मोहखेड, सुरनवाडी, चिखली तर तेलगाव मंडळात भोपा, कारी, कासारी, बोडखा, भोगलवाडी, चाटगाव, कांदेवाडी या गावांमध्ये पेरणीला मागील चार दिवसांपासून गती आली आहे. अंजनडोह मंडळातील सोनीमोहा, जहागीरमोहा, चोरांबा, चोंडी या ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे अंजनडोह आणि रेपेवाडी या गावात पाऊस नसल्याने शेतामध्ये ढेकळे कायम आहेत. धारूर मंडळातील गोपाळपूर, तांदळवाडी, गांजपूर, चिंचपूर, कोळपिंपरी, खोडस या ठिकाणी अद्याप पाऊस झालेला नसून या मंडळात फक्त घागरवाडा येथे पेरणीला सुरुवात झालेली आहे. धारूर आणि अंजनडोह मंडळातील अनेक शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करून ठेवले. मात्र, पाऊस नसल्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
तालुक्यात ४६ हजार ३२८ हेक्टर सरासरी खरीप पेरणी क्षेत्र असून २१ जूनपर्यंत ७ हजार १७५ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. एकूण १५ टक्के पेरणी मंगळवारपर्यंत झाल्याचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला .अर्ध्या तालुक्यात पाऊस तालुक्यातील दोन महसूल मंडळांच्या ठिकाणी म्हणजेच अर्ध्या तालुक्यात पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी कापूस, सोयाबीन पिकांची पेरणी सुरू केली आहे. काही गावांमध्ये कापसाची पेरणी आटोपली आहे. धारूर आणि अंजनडोह या दोन मंडळांत मात्र अद्याप पाऊस निरंक असल्यामुळे येथे पेरणी झालेली नाही. - राजेंद्र राऊत , कृषी सहायक, धारूर.
तेलगाव, मोहखेड मंडळात पेरणीच्या कामात शेतकऱ्यांनी गती घेतली आहे.
अर्ध्या तालुक्यात पाऊस तालुक्यातील दोन महसूल मंडळांच्या ठिकाणी म्हणजेच अर्ध्या तालुक्यात पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी कापूस, सोयाबीन पिकांची पेरणी सुरू केली आहे. काही गावांमध्ये कापसाची पेरणी आटोपली आहे. धारूर आणि अंजनडोह या दोन मंडळांत मात्र अद्याप पाऊस निरंक असल्यामुळे येथे पेरणी झालेली नाही. - राजेंद्र राऊत , कृषी सहायक, धारूर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.