आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:सरकारी गायरान जमिनीत जागा; केज येथे डॉ. आंबेडकर सभागृहाच्या जागेसाठी धरणे

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केज शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठी सरकारी गायरान जमिनीत जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तहसीलदारांकडे मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. केज शहारात मागासवर्गीय समाजासाठी सांस्कृतिक व इतर कार्यक्रम घेण्यासाठी सभागृहाची व्यवस्था नाही.

त्यामुळे शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठी सर्वे नं. ३० / २ मधील सरकारी गायरान जमिनीतील दोन एकर जागा देण्याचा प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात यावा या मागणीसाठी तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात गोपीनाथ ईनकर, अजय भांगे, गौतम बचुटे, दिलीप बनसोडे, अशोक गायकवाड, धनराज सोनवणे, बाबासाहेब मस्के, बाबा मस्के, नागेश जावळे, सतीश बनसोडे, प्रशांत ओव्हाळ, सिरसाट मेजर, पोलस्ती मस्के, यशवंत जोगदंड, उत्तम वाघमारे, विठ्ठल जाधव, पंडित, नाना जोगदंड हे सहभागी झाले होते

बातम्या आणखी आहेत...