आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडोणगाव ( ता. केज ) येथे येडेश्वरी क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सभापती - सरपंच चषक २०२२ या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन भाजपचे युवानेते तथा पंचायत समितीचे सभापती विष्णू घुले यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना आपले अंगातील कला, गुण आणि कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी व क्रिकेट प्रेमींना खेळाचा आनंद घेत यावा म्हणून येडेश्वरी क्रीडा मंडळाच्या वतीने डोणगाव येथे सभापती - सरपंच चषक २०२२ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी त्यांनी बॅटिंग करून तर केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी टॉस करून दोन संघामध्ये क्रिकेट सामना लावण्यात आला. कार्यक्रमाला भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे कर्णधार ज्योतिराम घुले, सरपंच लक्ष्मण घुले, पत्रकार दत्ता देशमुख, सुरेश जाधव, विष्णू बुरगे, विनोद जिरे, भागवत तावरे, सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवणे, उपसरपंच बन्सी भुसारे, माजी सरपंच बाबुराव घुले, सहशिक्षक शाहू गंभीरे, माजी उपसरपंच प्रचंड भुसारे, मनोज भुसारे, अभियंता विलास घुले, उद्योजक विश्वनाथ घुले, सुरेश घुले, विनोद घुले, बाळासाहेब नांदे व खेळाडू उपस्थित होते.
खेळातूनच आपण सारे घडतो, त्यामुळे मैदानावर वेळ द्यावा
शालेय ते महाविद्यालयीन जीवनात क्रीडा कौशल्यांसाठी वेळ दिला पाहिजे. खेळातूनच माणसाचे व्यक्तीमत्व घडते. तसेच खिलाडूवृत्ती ही आयुष्यात नेहमी कामाला येते. क्रीडा स्पर्धेतील विजय असो वा पराभव, या दोन्ही बाबी आपल्याला खूप काही शिकवतात, असे सभापती विष्णु घुले यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनीही मार्गदर्शन केले. अधिकाधिक खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होत राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन करत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.