आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवस:खासदार प्रीतम मुंडेंनी मोठ्या बहिणीला दिल्या शुभेच्छा; म्हणाल्या - तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस....

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंकजा मुंडे यांनी आज 42 वर्षात पदार्पण केले आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्या आज 42 वर्षाच्या झाल्या असून त्यांचा जन्म 26 जुलै 1979 रोजी झाला होता. अनेक वरिष्ठ नेते, कार्यकर्ते सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटी घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. परंतु, पंकजा मुंडे यांच्या लहान बहीण आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आपल्या बहिणीला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रीतम मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल ट्विटवरुन दोन तीन फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, "5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा" अशाप्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...