आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा समावेश:खामगाव कृषी केंद्रातून 40 महिलांना मसाला प्रशिक्षण ; कार्यक्रमाची  नुकतीच सांगता

गेवराई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव व धान फाउंडेशन, यांचा संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय मसाला प्रक्रिया उद्योग या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाची नुकतीच सांगता झाली. या कार्यक्रमाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या तीनदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये पाटोदा तालुक्यातील ४० महिलांचा समावेश होता.

महिला सक्षमीकरणासाठी महिलांना उद्योजक बनवणे तसेच महिलामध्ये असलेले सुप्त गुणांना शास्त्रांची जोड देऊन त्यांना एक यशस्वी उद्योजक निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने या मसाला प्रक्रिया उद्योगाविषयी सखोल मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह आयोजनात करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये पहिल्या दिवशी प्रा. दीप्ती पाटगावकर यांनी महिलांना उद्योजक बनवण्याकरिता त्यांच्या अंगी कोणकोणते गुण असावेत व कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर सांबर मसाला, पावभाजी मसाला, पाणीपुरी मसाला व इत्यादी मसाल्याबद्दल प्रात्यक्षिके देऊन महिलांना समजावून सांगितले. डॉ. तुकेश सुरपाम यांनी महिलांना या मसाल्याची ब्रँडिंग, पॅकेजिंग, फूड लायसन्स व बाजारपेठ याविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी प्रा. संगीता गायकवाड यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये महिलांना कमी भांडवलामध्ये सुद्धा एक उद्योजक बनता येते असे सांगून त्यांनी काळा मसाला, गरम मसाला, चहा मसाला व इत्यादी विविध मसाल्यांविषयी प्रात्यक्षिके करून दाखवली. शेवटी महिलांना नाबार्डचे प्रबंधक तात्यासाहेब मारकड यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...