आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा:शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, उद्या साहित्य दिंडी; साहित्य सम्राट गौरव महोत्सवांतर्गत स्पर्धा

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये साहित्य सम्राट गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवांतर्गत शुक्रवारी (२९ जुलै) लहुजी उस्ताद जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे उदघाटन तहसीलदार सुहास हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राजयोग फाउंडेशनचे शुभम धूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शेख शफिक, डॉ. सय्यद मसिह, डॉ.सय्यद अरशियान उल्लाह तर प्रमुख उपस्थितीत सुभाष लोणके, सनी आठवले, सुनील पाटोळे, रवी वाघमारे, डॉ. योगेश साठे, महेश धांडे, सनी वाघमारे, राहुल गवळी यांची उपस्थिती होती. लहुजी उस्ताद जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बाजी मारणाऱ्या बॉडी बिल्डर स्पर्धकांना ५० हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम विभागून देण्यात आली. तसेच प्रशस्तीत्रक आणि शिल्ड देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत जिल्हाभरातून स्पर्धक आले होते.या महोत्सवांतर्गत बीड शहरातील अण्णा भाऊ साठे सभागृहात रविवारी (३१ जुलै) सकाळी ११ वाजता महिलांना साड्यांचे वाटप होणार आहे. यासह सोमवारी (ता.१) सकाळी शहरातून अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची दिंडी काढली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...