आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुभाषिक परिवर्तन साहित्य‎ संमेलन:अंबाजोगाई येथील कवी‎ संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद‎

अंबाजोगाई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुभाषिक परिवर्तन साहित्य‎ संमेलनाच्या निमित्ताने निमंत्रित कवयित्रींचे संमेलन‎ अतिशय प्रतिसादात्मक व उत्साहपूर्ण वातावरणात पार‎ पडले. राज्यभरातून कवयित्रींनी आपापल्या वेगवेगळ्या‎ संवेदना वेगवेगळ्या जाणिवा व्यवस्थेवरही प्रश्न‎ मांडण्याचा कवितेतून अतिशय ताकतीने प्रयत्न केला.‎ या कवी संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा उषा किशन‎ भोसले (लातूर) ह्या होत्या. सुरुवातीला त्यांनी सर्व‎ कवयित्रींना शुभेच्छा दिल्या.

नीलिमा देशमुख‎ (जीवनाचा वृत्तांत ), रजनी गिरवलकर ( मीच भेटलो‎ नाही), मीनाक्षी देशमुख (आम्ही निघालो चंद्रावर),‎ शैलजा कारंडे विजया भणगे (सावित्री) वैष्णवी‎ सोमवंशी (नारे), विमल मुदाळे (स्वप्ना मधलं‎ जगणं), श्रीदेवी हांडे (आई), सुकन्या पवार (बेटी‎ जब मा बन जाती है), डॉ.सुरेखा बनकर (दान),‎ सुलक्षणा सोनवणे(शाप), डॉ.मीना घुमे (इच्छाएँ)‎ आणि पुष्पा बगाडे इत्यादी कवयित्रींनी सहभाग‎ नोंदवला. शितल बोधले यांच्या बहारदार‎ सूत्रसंचालनाने कवी संमेलन रंगत गेले. अतिशय सुंदर‎ आवाजामध्ये सूत्रसंचालन व कवितांनाही त्यांनी त्यांनी‎ उत्तम प्रतिसाद दिला. शैलजा कारंडे यांची ''बायका‎ असंही खोटं बोलतात'' ही कविता दाद देऊन गेली.‎ अध्यक्षीय भाष्य करताना उषा भोसले यांनी ''कृष्ण‎ धावणार नाही'' या कवितेने व्यवस्थेवर अतिशय‎ परखडपणे भाष्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...