आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोरीचे ग्रहण:खाकी'वर डाग; वर्षात आठ जाळ्यात

अमोल मुळे | बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हफ्तेखाेरी, लाचखाेरी, अवैध धंद्यांना अभय यामुळे जिल्हा पोलिस दलाची प्रतिमा दिवसागणीक मलीन होत आहे. पहिले लाचखोर पीआय आणि कर्मचारी कारागृहात जाऊन चोवीस तासही होत नाहीच तोच पुन्हा एक पोलिस उपनिरीक्षक गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. मागील ११ महिन्यांत ८ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी एसीबीने लाच घेताना अटक केले आहे. जिल्हा पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान एसपी नंदकुुमार ठाकूर यांच्यासमोर असणार आहे.

जिल्हा पोलिस दल मागील सुमारे सहा महिन्यांपासून हफ्तेखोरी आणि लाचखोरीच्या आरोपामुळे गाजत आहे. तत्कालीन एसपी आर. राजा यांच्या कारभारावर थेट अधिवेशनात सर्व आमदारांनी आवाज उठवल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नांदेडहून नंदकुमार ठाकूर यांची बदली करण्यात आली. ते आल्यानंतर तरी प्रतिमा सुधारेल असे वाटत असतानाच त्यांनाही या प्रकाराला आळा घालण्यात फारसे यश आलेले दिसत नाही. मागील मागील दोन दिवसांत दोन ट्रॅपमध्ये दोन अधिकारी आणि एक कर्मचारी अडकला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ८ डिसेंबर या काळात जिल्ह्यात एकूण २२ सापळे झाले. यात, पोलिस दलावर ६ ट्रॅप झाले. यात, एकूण ८ पोलिस लाच घेताना आणि लाच मागण्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आले आहेत. यामध्ये, ४ पोलिस उपनिरीक्षक, एक सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि ३ पोलिस नाईक यांचा समोवश आहे.

दरम्यान, जिल्हा पोलिस दलात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशी चर्चा असतानाच दोन दिवसांत झालेल्या कारवायांमुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आरटीओ, सरकारी वकीलही जाळ्यात : दरम्यान, पोलिसांसोबतच युनिफॉर्म सर्व्हिस असलेल्या परिवहन विभागतही स्थिती अशीच आहे. आरटीओ रविकिरण भड यांच्यावर २ हजारांच्या लाच प्रकरणात २० जानेवारी २०२२ राेजी गुन्हा नोंद झाला आहे तर,२१ सप्टेंबर रोजी धारुरच्या सहायक सरकारी वकील सुरेखा लांब अाणि खासगी वकील रोहिदास गोरे यांच्यावरही दीड हजारांच्या लाच प्रकरणात गुन्हा नोंदवला गेला

असे झाले पोलिस दलावर ट्रॅप ३ मार्च : पाटोद्याचे पीएसआय अफरोज पठज्ञण ४० हजारांची लाच घेताना अटक ३२ मार्च : धारुरला पोलिस नाईक तेजस वाव्हुळे १० हजारांची लाच घेताना पकडले २९ एप्रिल : अंबाजोगाई गएएसआय प्रमोद सेंगर, पोलिस नाईक नितीन चौरे १५ हजार घेताना गजाआड ११ मे : अंबाजोगाईत पोलिस उपनिरीक्षक गोपाल सूर्यवंशी ४० हजारांची लाच घेताना सापळ्यात ५ डिसेंंबर : शिवाजीनगरचे पीएसआय राजू गायकवाड, कर्मचारी विकास यमगर १५ हजार घेताना ट्रॅपमध्ये ८ डिसेंबर : सिरसाळ्यात पोलिस उपनिरीक्षक प्रमोद शेळके १० हजार घेताना रंगेहाथ पकडले

बातम्या आणखी आहेत...