आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा

केज24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाडी घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून एका २८ वर्षीय विवाहितेचा सतत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना सावळेश्वर (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सावळेश्वर (ता. केज) येथील रोहिणी रंजीत पवार (२८) या विवाहितेस १६ एप्रिल २०२१ पासून तिचा पती रंजित बालासाहेब पवार, सासरे बालासाहेब साहेबराव पवार, दिर शशिकांत बालासाहेब पवार, जाऊ सुनंदा शशिकांत पवार (सर्व रा. सावळेश्वर) यांनी तू दिसण्यास चांगली नाही, तूला कामधंदा येत नाही असे कारण काढून गाडी घेण्यासाठी तुझ्या माहेराहून १० लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला. शिवीगाळ व मारहाण करुन १० ऑक्टोबर २०२२ पर्यंत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळास कंटाळून अखेर या विवाहितेने फिर्याद दिली.

बातम्या आणखी आहेत...