आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तिरस:श्री गुरुलिंग स्वामी पालखी सोहळ्यात शिवनामाचा गजर, दर्शनासाठी मोठी रीघ

परळी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीरशैव लिंगायत समाज परळी व श्री गुरूलिंग स्वामी देवस्थानच्या वतीने ३० ऑगस्टपासून सुरू असलेल्या संतश्रेष्ठ श्री गुरूलिंग स्वामी यांच्या १२१ व्या पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहाची मंगळवारी (ता.६ सप्टेंबर) सांगता झाली. यानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी काढण्यात आली. शिवनामाचा गजर, जागोजागी भाविकांकडून श्रींच्या पालखीवर करण्यात आलेली पुष्पवृष्टी यामुळे अवघे वातावरण भक्तीरसाने न्हाऊन निघाले.

कोरोनाचे दोन वर्षांचे निर्बंध शिथील झाल्यानंतर परळी येथे श्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. परळी येथे बेलवाडी मंदिरात आयोजित या सप्ताहाची सांगता भक्तीपूर्ण व उत्साहात सांगता झाली. या सप्ताहात सात दिवसांपासून अखंडपणे शिवनाम सप्ताह व धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले. दररोजची आरती आणि महाप्रसादही अखंडपणे सुरु होता. मंगळवारी सकाळी ९ वाजता वैद्यनाथ मंदिर येथून संतश्रेष्ठ श्री गुरूलिंग स्वामी यांची पालखी काढण्यात आली. वक्रेश्वर मंदिर येथून पुढे शहरातील प्रमुख मार्गावरून शिवनामाचा गजर करीत पालखी मार्गस्थ होत गेली. श्री संत गुरुलिंग स्वामी महाराज पालखी वैद्यनाथ मंदिर, देशमुखपार, अंबेवेस, गणेशपार, नांदूरवेस, गोपनपाळे गल्ली, आंबेवेस, भोई गल्ली मार्गे बेलवाडी येथे पोहोचली. यानंतर प्रवचन, आरती व महाप्रसादाने सांगता झाली. जागोजागी भाविकांकडून पालखीतील श्रींचे दर्शन करण्यासोबतच पुष्पवृष्टी केली जात होती. ओम नमः शिवायचा जप, मन्मथस्वामी व गुरूलिंग स्वामींचा जय जय जयकार जागोजागी केला जात होता. वीरशैव लिंगायत समाज बांधवांचा पालखी सोहळ्यात सक्रीय सहभाग होता. पालखी सोहळ्यानंतर श्री शिवलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांचे आशिर्वचन पार पडले. महाराजांनी शिवनाम जपावर भर देण्याचे आवाहन भाविकांना केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुलिंग स्वामी देवस्थानचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी, सचिव अ‍ॅड.गिरीष चौधरी, सदस्य प्रा.रामलिंग काटकर, रत्नेश्वर कोरे, सोमनाथ हालगे, विजयकुमार मेनकुदळे, शिवकुमार व्यवहारे, शंकर उदरगीरकर, शिवशंकर निर्मळे, अक्षय मेनकुदळे, अ‍ॅड.मंदार नरवणे व समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधव व भगिनी यांनी यांनी परिश्रम घेतले.

सामाजिक शांततेसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज सद‌्गुरू श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडला. सप्ताहात त्यांचे आशिर्वचन पार पडले. आपल्या आशिर्वचनातून महाराजांनी सामाजिक, सार्वजनिक शांततेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत व शरीर शुद्धीकरणासाठी शिवनाम जपावे, असे सांगितले. शिवनामात मोठी ताकद आहे. मानवी जीवनात अध्यात्माची ताकद मोठी असते. याच माध्यमातून मानवी जीवनाचा उत्कर्ष होऊ शकतो, असेही श्री सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...