आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कार्तिक पौर्णिमा यात्रेसाठी श्रीक्षेत्र कपिलधार सज्ज

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री मन्मथ स्वामी महाराज यांची संजीवन समाधी असलेल्या श्री क्षेत्र कपिलधार येथे ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान कार्तिक पौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त मंदिराची रंगरंगोटी केली असून विद्युत रोषणाईने मंदिर व परिसर उजळून निघाला आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सीईओ अजित पवार आदींनी भेट देऊन पाहणी केली.

वीरशैव समाजाचे श्रध्दा स्थान असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमा यात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रसंत अहमदपूर कर महाराजांनी यात्रोत्सवात दिंडीची परंपरा सुरू केली. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटकातील भाविकांची तीन दिवस रेलचेल असल्याने भक्तिमय वातावरणाने श्रीक्षेत्र कपिलधार दुमदुमून जाते. देवस्थान पंच कमिटीच्या वतीने दीडशेवर स्वयंसेवक दिवस,रात्र कार्यरत राहणार आहेत. महिनाभरापासून देवस्थान कमिटीच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे.

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सीईओ अजित पवार यांनी मंदिर व परिस, दर्शनबारी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भोजन कक्ष याची पाहणी करुन देवस्थान कमिटीला सूचना केल्या. यावेळी तहसीलदार सुहास हजारे, डीवायएसपी संतोष वाळके, पी आय संतोष साबळे, नेकनूरचे एपीआय शेख मुस्तफा, देवस्थान पंच कमिटीचे सोमनाथ हालगे, शांत वीर चौधरी, बाबासाहेब कोरे, नागेश मिटकरी, शिवशंकर भुरे, श्रीकांत मिटकरी, अशोक शहागडकर, विष्णुपंत वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यात्रोत्सव काळात बीड व नेकनूर येथील वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका व अग्निशामक दल तैनात राहणार आहे. कपिलधार येथे ३ नोव्हेंबर पर्यंत जवळपास ३० दिंड्यांची नोंद झाली होती. जवळपास साठहून अधिक दिंड्यांच्या दाखल होणार आहेत.

कमानीपासून मोफत बस व्यवस्था
कार्तिक पौर्णिमेला दरवर्षी लाखो भाविक कपिलधार येथे दिंडी व विविध वाहनांच्या माध्यमातून दाखल होतात. तीन दिवस भाविकांचा कपिलधारला मुक्काम असतो. यामुळे वाहने पार्किंग, वाहतुक कोंडी पाहता यंदा श्रीक्षेत्र कपिल धारच्या कमानी जवळ पार्किंगची व्यवस्था केली आहे. भाविकांसाठी तीन दिवस तीन खासगी बसेसची मोफत व्यवस्था केली आहे.

सातशेवर स्टॉल,२२ शौचालयांची सोय
यात्रोत्सवात सातशे च्या वर विविध प्रकारची दुकाने व स्टॉल राहणार आहेत. लाखो भाविक तीन दिवस मुक्कामी राहात असल्याने २२ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. धबधब्यात रॅलिंग व पाय घसरु नये म्हणून आतील बाजूस विशिष्ट प्रकारचे रंगकाम करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था उत्तम प्रकारे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...