आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:25% कर्मचारी कर्तव्यावर रुजू, आठ बसेस सुरू‎; गेवराई आगाराला 72 दिवसांत साडेतीन कोटींचा फटका, एकूण 59 बसेस‎

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारने‎ प्रश्न मार्गी‎ लावावा‎

गेवराई‎ गेवराई आगारात मागील दोन‎ महिन्यांपासून एसटी बसच्या‎ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. यामुळे आगाराचे आतापर्यंत‎ दररोज ५ लाख रुपये या प्रमाणे ३‎ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान‎ झालेले आहे. आतापर्यंत २५ टक्के‎ एसटी बसचे कर्मचारी कर्तव्यावर रुजू‎ झाले असून गेवराई आगारातून आठ‎ बस सुरू करण्यात आल्या आहेत.‎ मागील ७२ दिवसांपासून विविध‎ प्रकारच्या मागण्यांसाठी एसटी‎ महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत‎ आंदोलने सुरू केले आहेत. शुक्रवारी‎ गेवराई आगारातील एसटी‎ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा ७३ वा‎ दिवस होता.

दरम्यान, गेवराई येथील‎ आगारात एकूण ५९ बसेस असून‎ मागील आठवड्यापासून औरंगाबाद‎ ४, जालना २, आणि सोलापूर २ अशा‎ ८ बसेस सुरू करण्यात आलेल्या‎ आहेत. येथील आगारात ८७ चालक,‎ ११७ वाहक, प्रशासकीय कर्मचारी २२,‎ यांत्रिकी कर्मचारी ३० असून‎ सध्याच्या परिस्थितीत चालक ०८ ,‎ वाहक १० तर प्रशासकीय कर्मचारी‎ सर्व २२ तसेच यांत्रिकी १५ हजर‎ आगारात आहेत. दरम्यान सध्या २५%‎ कर्मचारी सध्या कर्तव्यावर हजर झाले‎ आहेत. गेवराई आगारात आतापर्यंत‎ ६२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई‎ करण्यात आली आहे.‎

संप‎ अजूनही मागे न घेतल्याने आगारात असा शुकशुकाट आहे.‎
आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात राज्य सरकारला निश्चित‎ तोडगा काढता आला नाही. हा प्रश्न सरकारने तत्काळ मार्गी लावावा तसेच‎ आम्ही कर्मचाऱ्यांच्या भावना समजू शकतो.‎ -राजेंद्र मोटे, मनसे, जिल्हाध्यक्ष.‎

कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर‎ हजर राहावे‎ सध्या प्रवाशांची गैरसोय होत‎ आहे. एसटी महामंडळाचेही‎ आर्थिक नुकसान होत आहे. तरी‎ आगारातील कर्मचाऱ्यांनी‎ संपातून माघार घेत आपल्या‎ नियोजित कर्तव्यावर हजर व्हावे.‎ -बालाजी अडसुळे, प्रभारी‎ आगारप्रमुख, गेवराई.‎