आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:गेवराईच्या सेंट झेवियर्स हायस्कूलने मारली बाजी ; प्रथम येण्याचा मान अक्षित भानुदास काशीद याने पटकावला

गेवराई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई तालुक्यातील विविध स्पर्धात्मक परीक्षण सह सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या सेंट झेवियर्स हायस्कूल नुकत्याच झालेल्या दहावी बोर्डच्या परीक्षेतही घवघवीत यश संपादन करून बाजी मारली आहे यावर्षीही शाळेचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शालांत परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये झालेल्या एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात येथील सेंट झेवियर्स स्कूलचे ११३ पैकी ११३ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे यात ९१ ते १०० टक्क्यांमध्ये ४५ विद्यार्थी, ८१ ते ९० टक्के यांमध्ये ५५ विद्यार्थी, ७१ ते ८० टक्के मध्ये १२ विद्यार्थी तर ६१ ते ७० टक्के यांमध्ये एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. गुणानुक्रमे शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान अक्षित भानुदास काशीद याने पटकावला असून, दुतिय क्रमांक अजिंक्य दिगंबर ढाकणे, प्रशांत श्रीराम आटपाळे तर तृतीय क्रमांक आदित्य कल्याण वाघमारे याने पटकावला आहे. पहिल्यांदाच शाळेतून मुलींना बाजूला सारून मुलांनी बाजी मारली आहे. १८ जून रोजी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेचे प्राचार्य फादर पीटर खंडागळे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष, दिनकर शिंदे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल भालेकर, पर्यवेक्षक दीपक देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बोलताना शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष दिनकर शिंदे म्हणाले की, सेंट झेवियर्स स्कूलने आपला एक वेगळा शैक्षणिक पॅटर्न निर्माण केला आहे.

बातम्या आणखी आहेत...