आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य शासनाचे निर्देश:नुकसान भरपाई मिळणार

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील सोयाबीन व इतर पिकांचे गोगलगायींनी प्रचंड नुकसान केले आहे. पिकांचे पंचनामे करून ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान आहे, अशांना मदत देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाने एका परिपत्रकाद्वारे पारित केले आहेत.

बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांसह राज्यात अन्य काही भागातील १ लाख ६३ हजार ८८९ हेक्टर क्षेत्र गोगलगायींनी बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास द्यावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त व संबंधित जिल्हा प्रशासनास राज्य शासनाने एक परिपत्रक काढून दिले आहेत. -

बातम्या आणखी आहेत...