आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Beed
  • State Highways To Be Constructed At Ashti Under Pradhan Mantri Gramsadak Yojana At A Cost Of Rs 5 Crore; Recommendations During The Tenure Of Former Guardian Minister Pankaja Munde |marathi News

दळणवळण:आष्टीमध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 5 कोटी रुपये खर्चून होणार राज्य महामार्ग; माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या काळात शिफारसी

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चिखली येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रामा-५४ ते हनुमंतगाव,चिखली रामा-७० लांबी ८७० कि.मी. अंतराचा ४ कोटी ९५ लक्ष रुपये निधी खर्चून रामा-७० या रस्ता कामाचा भूमिपुजन समारंभ भाजपाचे बीड-उस्मानाबाद-लातुर मतदारसंघाचे विधानपरिषदचे आ.सुरेश धस यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी व्यासपीठावर महादेव शिंदे,जि.प.सदस्य अमर निंबाळकर, जि. प.माऊली जरांगे, सभापती बद्रीनाथ जगताप, गणेश शिंदे,ॲड.बाळासाहेब झांबरे,पीएमजिएसवायचे शाखा अभियंता साळवी, उपअभियंता गुजर आदी उपस्थित होते.

आ.सुरेश धस म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रामा-५४ ते हनुमंतगाव,चिखली रामा-७० लांबी ८.७० कि.मी. अंतराचा ४ कोटी ९५ लक्ष रुपये खर्चून होणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी खा. प्रीतम मुंडे यांचेदेखील मोठे सहकार्य आहे. कारण आम्ही दिलेल्या यादीला त्यांचा होकार लागतो.4 कोटी ९५ लक्ष रुपये खूप मोठी रक्कम आहे. यावर २४ च्यावर छोटी-मोठीले पुलं होणार आहेत. हे कामे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या काळात शिफारसी करण्यात आल्या होत्या. आता सध्या आपल्याकडे असेच चालू आहे, शिफारस एकाची आणि नारळ फोडणारे एक आणि हे करून ढगात गोळ्या मारायचे काम सध्या सुरू आहे.

तसे पाहिले तर खरी चिडचीड हनुमतगावच्या रस्त्यापासून सुरू झाली. रस्ता मंजूर करून आणला मी आणि आपल्या विरोधकांनी दुसऱ्याच्या गळ्यात हार घातला. त्यांनी सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की आपण कशाचा हार घालत आहोत ते असा टोला विरोधाकांना बोलताना आ.धस यांनी लगावला.

कोरोना काळात चिखलीकर यांनी सुद्धा खूप भोगले आहे, चांगली चांगली माणसे त्यांनी गमावले आहेत. त्याचबरोबर घरकुल ड प्रपत्रामधील घरकुलामध्ये तक्रारी येत आहेत. गावातुन चारशे नावे गेली तर त्यातील दोनशे नावे राजकारण करून वगळली जात आहेत हे दुर्दैव असल्याची खंत यावेळी आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली. यावेळी शिवाजी आवारे, अमोल शिंदे, कांतीलाल टकले, नवनाथ चखाले, शिवाजी घोलप, शिवाजी महाराज कोकणे,सोमनाथ शिंदे, शांतीलाल घोलप ,अण्णा तांबे,गोरख कोकणे, सुधाकर कोकणे, संपत आवारे,हमीद पठाण, काशिनाथ शिंदे, दादा पाटील,रतन शिंदे,शिवाजी कोकणे, दिवाकर कुलकर्णी, हारून शेख,भाऊ शिंदे, राजू पवळ, दगडु वाळेकर, संजय कोकणे, दास चाखले, दादा चाखले यांच्यासह सांगवी, खडकत, टाकळसिंग, हिंगणी, दैठणा, हनुमंतगाव, इमणगाव, खानापूर, मंगरूळ या गावचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

४०० किलोंचा हार घालून जंगी स्वागत
चिखली व हनुमंतगाव येथील आमदार सुरेश धस मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते व युवा कार्यकर्ते गणेश शिंदे यांच्या वतीने आ.सुरेश धस यांचे डी.जे.आणि ढोल ताशामध्ये जंगी स्वागत करून सुमारे ४०० किलोचा हार घालून आ.धस यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...