आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रॉस कंट्रीतून जिल्हा पातळीवरील वैयक्तिक व सांघिक विजेत्या खेळाडूंना राज्यस्तरीय पातळीवर खेळण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केले. शहराजवळील चऱ्हाटा फाटा येथे बीड जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन (ॲडव्हॉक कमिटी) च्या आयोजित जिल्हा क्रॉस कंट्री निवड चाचणी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा क्रीडाधिकारी सुहासिनी देशमुख, खान सबीहा बेगम, जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव डॉ.अविनाश बारगजे, प्रा.डॉ. भागचंद सानप, प्रा.डॉ.शंकर धांडे, प्रा.डॉ. शेटीबा चौगुले, यांच्यासह आयोजक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन (ॲडव्हॉक कमिटी)चे डॉ. शेख शकील रहीम, दिनेश पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. क्षीरसागर म्हणाले पुढे म्हणाले, की आजच्या शिक्षणाच्या स्पर्धेच्या युगात खेळाला महत्व प्राप्त झाले आहे. विविध स्पर्धा परीक्षांत खेळाडूंसाठी अनेक जागा राखीव असतात.
एखाद्या खेळाडूने विशिष्ट स्तरावर खेळ खेळला असेल तर त्याचे ५ गुण ग्राह्य धरून त्यास शासकीय नोकरीत प्राधान्य दिले जाते. त्यासाठी अथक परिश्रम, मेहनत, जिद्द व चिकाटी अंगी असणे आवश्यक आहे. आपण कोणत्याही खेळात तेव्हाच पारंगत होतो जेंव्हा आपण स्वतःला पूर्णपणे वाहून घेतो. आपण जर राष्ट्रीय खेळाडू पाहिले तर त्यांनी काही वर्षाच्या मेहनतीने ती उंची गाठलेली नसते. त्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच स्वतःला झोकून दिले असते. आपणही स्वतःला झोकून द्या, प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर यश संपादन करा असे आवाहन केले. यावेळी सुखदेव माने, उज्वल गायकवाड, मसरुर अन्वर, जब्बार शेख यांच्यासह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मैदानी स्पर्धांतील क्रीडा प्रकार
१०० मीटर धावणे, २००मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, ६०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, ४×१०० मीटर रिले, ४×४०० मीटर रिले, ३००० मीटर धावणे, ५००० मीटर धावणे , लांब ऊडी, उंच उडी, भालाफेक, गोळा फेक, हातोडा फेक, बांबू उडी आदी खेळ बाबींचा वेगवेगळ्या वयोगटांमध्ये समावेश होतो. शालेय स्पर्धांमध्ये १४,१७ व १९ वयोगटात या विविध स्पर्धा खेळल्या जातात.
क्रॉस कंट्री (लांब पल्ल्याची शर्यत)
खुला गट (२० वर्ष वयाच्या पुढे वय) यात १० किलोमीटर धावणे (पुरुष) १० किलोमीटर धावणे (महिला).२० वर्षे वयोगट यात किलोमीटर धावणे (मुले), ६ किलोमीटर धावणे (मुली).१८ वर्षे वयोगट यात ६ किलोमीटर धावणे (मुले), ४ किलोमीटर धावणे (मुली). १६ वर्षे वयोगट यात २ किलोमीटर धावणे (मुले), २ किलोमीटर धावणे (मुली) आशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.